क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबई

हो ! कसोटी न खेळताही भारताने ऑस्ट्रेलियाला टाकले मागे; मात्र, ICC च्या चुकीने केली निराशा

नवी दिल्ली : ICC test cricket world rankings 2023 : भारतीय संघाने मंगळवारी काही तासांतच ‘टेस्ट किंगचा मुकुट’ गमावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामितीच्या (ICC) कसोटी संघ क्रमवारीत (ICC Test Team Rankings) भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले होते. मात्र, भारताचे हे अव्वल स्थान केवळ अडीच तासच टीकले. (Team India Top In ICC’s Test Team Ranking)आयसीसीने काही वेळाने प्रसिद्ध केलेल्या कसोटी संघ क्रमवारीत कांगारुंनी पुन्हा पहिले स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाला 126 तर भारताला 115 रेटींग मिळाले आहे. 17 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजता ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या क्रमवारीत पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र दुपारी दीड वाजता भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला. यानंतर दुपारी चार वाजता पुन्हा क्रमवारीत बदल झाला. कांगारू संघाने भारताला पुन्हा दुसऱ्या स्थानावर ढकलले. (ICC Test Team Rankings) Big Mistake From ICC in test team ranking India And Australia.

big mistacke in icc test cricket world rankings 2023 2

सध्या ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा 11 रेटींगने जास्त आहेत. दुपारी जेव्हा कसोटी संघांची क्रमवारी अद्ययावत केली गेली तेव्हा ऑस्ट्रेलियाचे 111 रेटिंग होते. मात्र, भारताच्या गुणांमध्ये कोणताही बदल झाला नाही. (ICC Test Team Rankings) भारताने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली होती. ज्यात भारताने 2-0 क्लिन स्वीप दिला होता. ऑस्ट्रेलियाची शेवटची कसोटी मालिका द. आफ्रिकेसोबत रंगली. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. एक सामना अनिर्णित राहिला.

भारतासोबतच इतर अनेक संघांच्या गुणांवर परिणाम झाला आहे. द. आफ्रिकेला (102 रेटींग) एक स्थानाचा लाभ झाला आहे. त्यांनी न्यूझीलंडला मागे टाकून चौथे स्थान मिळवले. न्यूझीलंड (99) पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. त्यांची पाकिस्तान विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित राहिली. इंग्लंडचा संघ (107) तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान (88) सातव्यावरून सहाव्या स्थानावर आला आहे. श्रीलंका (88), वेस्ट इंडिज (79), बांगलादेश (46) आणि झिम्बाब्वे (25) अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

big mistacke in icc test cricket world rankings 2023 1

आयसीसीची मोठी चूक
आयसीसीच्या वेबसाइटमधील त्रुटीने ऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रमवारीतील पहिले स्थान हिसकावून घेतले आणि ते भारताला बहाल करण्यात आले. (ICC Test Team Rankings) त्यामुळे काही तासांसाठी रोहित ब्रिगेड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचले. आयसीसीच्या स्टॅटिक्स विभागाने ऑस्ट्रेलियाला ताज्या क्रमवारीत 126 रेटींग देण्याऐवजी 111 रेटींग दिले. तर त्याचवेळी टीम इंडियाच्या खात्यात 115 रेटिंग जमा करण्यात आले. ज्यामुळे भारतीय संघ कसोटी जागतिक क्रमवारीत नंबर 1 बनला. मात्र, ही गडबड काही तासांत लक्षात येताच आयसीसीने आपली चूक सुधारली आणि नवीन क्रमवारी जाहीर केली. ज्यात ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये