देश - विदेश

कॉंग्रेस नेता आणि प्रसिध्द पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

inc leader and panjabi singer siddhu moose wala shot dead | पंजाबमधील विरोधी पक्षनेते आणि प्रसिद्ध गायक सिद्धू मूस वाला (siddhu moose wala) यांची पंजाबातील मनसा (mansa, panjab) जिल्ह्यात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंजाब सरकारने (AAP) सिद्धू यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या झाली आहे. (panjabi singer siddhu moose wala shot dead)

घटनेनंतर गंभीर अवस्थेत त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार पंजाब सरकारने सिद्धू यांच्यासह आणखी ४२४ जणांची सुरक्षा (security) एका दिवसापूर्वीच काढून घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिद्धू यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याने पंजाब सरकारवर (panjab government) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सिद्धू हे मनसा जिल्ह्यातून कॉंग्रेसच्या तिकिटावरून निवडणूक लढले होते. विरोधात आपचे विजय सिंगला (vijay singala) होते. सुमारे ६३००० मतांनी विजय सिंगला याठिकाणी निवडून आले होते. काहीच दिवसांपूर्वी विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मुख्यमंत्री भगवंत माण यांनी हाकलून लावले आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धू मूस वाला यांनी त्यांच्या गाण्यात आप समर्थकांना ‘गद्दर’ (देशद्रोही) म्हटले होते. त्यांनतर मोठा वादही आपच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये