क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

पांड्याची तुफानी खेळी; भारताचा ऑस्ट्रेलिया संघासमोर 209 धावांचा डोंगर उभा!

India vs Australia 1st T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस हेजलवूड आणि नॅथन एलिसने हा निर्णय पॉवर प्लेमध्येच सार्थ करून दाखवला. हेजलवूडने रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले. तर एलिकने विराट कोहलीला 2 धावेवर माघारी धाडले.

मात्र, केएल राहुल, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघ गारद झाला. त्यांच्या जोरदार धावांमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले. हार्दिक पांड्याने 30 चेंडूत नाबाद 71 धावा चोपल्या. तर सलामीवीर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 46 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने 3 तर जॉश हेजलवूडने 2 विकेट्स घेतल्या.

रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले. तर विराट कोहलीला 2 धावा काढत माघारी गेला. केएल राहुल 35 चेंडूत 55 धावा, सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 46 धावा, अक्षर पटेल देखील 6 धावांची भर घालून परतला. तर दिनेश कार्तिक 6 चेंडूत 6 धावा काढल्या, हार्दिकने 30 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. हर्षल पटेल नाबाद 4 चेंडूत धावा करत भारतील संघाने 209 धावांचा डोंगर ऑस्ट्रेलिया संघासमोर उभा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये