ताज्या बातम्यारणधुमाळी

“गुजराती नेत्यांसाठी असलेलं सरकार जास्त दिवस टिकणार नाही”

मुंबई | Nana Patole On State Government – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गुजराती नेत्यांसाठी असलेलं सरकार जास्त दिवस टिकणार नाही. हे ब्लॅकमेल सरकार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच हे जनतेचं सरकार नसल्याचंही पटोले म्हणाले. पहाटेचं सरकार पडलं तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते, म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो होतो असंही पटोले म्हणाले. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. या यात्रेला 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली आहे. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या राज्य सरकारमध्ये मलाईदर खात्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचंही पटोले म्हणाले. सध्या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी आमची ही आझादी गौरव यात्रा सुरु असल्याचं पटोले यावेळी म्हणाले.

पुढे नाना पटोले म्हणाले, विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेले आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळाले आहे. विधानपरिषदेचा नेता आम्हाला हवा होता. विरोधी पक्षनेते पदाबाबत बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही. आमची आघाडी ही विपरीत परिस्थीतीमध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये