क्रीडादेश - विदेश

‘ताई तू आमच्या आयुष्यातील…’; बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेलची भावनिक पोस्ट

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहिण अर्चिता पटेलचं ९ एप्रिल रोजी निधन झालं. तसंच बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेलनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, बहिणीचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर सामन्यानंतर हर्षल त्याच्या घरी गेला होता. बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर हर्षलला क्वारंटाईनमुळे तीन दिवस संघापासून दूर राहावे लागले. मात्र, त्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला असून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही तो संघाचा भाग होता.

१६ एप्रिल रोजी हर्षल दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि संघाच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर भावूक हर्षल पटेलने त्याच्या दिवंगत बहिणीसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

“ताई, तू आमच्या आयुष्यातील सर्वात उदार आणि आनंदी व्यक्ती होतीस. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन तू अविश्वसनीय अडचणींचा सामना केला. जेव्हा मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते आणि माझी काळजी करू नका असे म्हटले. या शब्दांमुळेच काल रात्री मी मैदानात परत येऊ शकलो,” असे हर्षलने म्हटलं आहे.

पुढे हर्षलने म्हटलं आहे की, “आता मी तुझे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी एवढेच करू शकतो. तुला माझा अभिमान वाटेल ते सर्व मी करत राहीन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येईल, चांगल्या आणि वाईट. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आत्म्याला शांती लाभो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये