तालिबानचा पाकिस्तानवर कब्जा; युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान बोर्डर करण्यात आली सील
नवी दिल्ली | तालिबाननं (Taliban) पाकिस्तानवर (Pakistan) कब्जा केला आहे. तहरिक ए तालिबान पाकिस्तान (TTP) ने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या तोरखम बॉर्डर टर्मिनलवर TTP आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात गोळीबार सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानच्या 4 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पाक सैनिकांना बंदीस्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अफगाणिस्तान बॉर्डर सील केली आहे.
TTP ने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत TTP च्या कमांडरनं माध्यमांना सांगितलं की, आम्ही पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला असून सध्या तेथील इंटरनेट नेटवर्क खराब आहेत. त्यामुळे नेटवर्क आल्यानंतर आम्ही कब्जा केलेल्या गावांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आणू.
TTP नं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याला हरवून आम्ही तिथल्या सरकराची सत्ता उखडून टाकू. त्यानंतर तिथे तहरीक ए तालिबान शरिया कायद्याचं पालन करणारे सरकार बनवलं जाईल. यासाठी TTP नं मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानात मोठमोठे हल्ले केले आहेत.