मंत्री सावंतांची जीभ पुन्हा घसरली; नागडं केल्याशिवाय राहणार नाही विरोधकांना इशारा!

मुंबई : (Tanaji Sawant On Dhananjay munde) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची विरोधकांवर टिका करताना पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य सावंत यांनी केले. शिवसेनेसोबत सावंत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीनंतर ‘निष्ठा यात्रा’ सुरू केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या ‘निष्ठा यात्रे’च्या दौऱ्यात सातत्याने बंडखोरांना लक्ष्य केले जात आहे. त्याला प्रतित्यूत्तर म्हणून शिंदे गटाने ‘हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा’ सुरू केली आहे. या संपर्क यात्रेसाठी तानाजी सावंत बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली.
शिवसेनेच्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्ली बाप पळवणारी टोळी आली असल्याचे टीका केली होती. त्यांच्या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.