ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, सावंताची ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर जाहिर माफी!

मुंबई : (Tanaji Sawant On Maratha Kranti Morcha) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असलेले राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, त्यांनी एका सभेत मराठा समाजावर वादग्रस्त वक्तव्य केलं. मराठा समाज आता ओबीसी किंवा SC मध्ये आरक्षण मागत आहे. दोनवेळा आरक्षण गेलं तेव्हा गप्प राहिलात, पण आता सत्तांतर झाले की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली आहे असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होत.

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला होता. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांच्याकडून सावंत यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सावंत यांनी मराठ्यांनी ओबीसी आरक्षण बाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागावी अशी मागणाी क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

त्यानंतर तानाजी सावंतांनी यांनी अखेर मराठा समाजाची बिनशर्त आणि सपशेल माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये