टीम इंडियाची इंग्लंडविरुद्ध रणनीती ठरली
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मंगळवारी इंग्लंडमधील लिसेस्टरशायर येथे कसोटी संघात दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरसह द्रविड लंडनला रवाना झाले. दरम्यान, संघासोबत सामील होताच द्रविड अॅक्शन मोडमध्ये दिसले आणि प्रशिक्षण सत्रादरम्यान त्याने सर्व खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी संबोधले.
इंग्लंड दौर्यापूर्वी विराटही कोरोना पॉझिटिव्ह
विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शेवटच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी हा मोठा झटका ठरू शकतो. कोहलीच्या कोरोना रिपोर्टने चाहत्यांची चिंता वाढवलीय. मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याचे आता समोर येतेय. मुळात, असे असूनही तो इतर खेळाडूंसोबत इंग्लंड दौर्यावर पोहोचला आणि बीसीसीआयनेही ही बातमी उघड होऊ दिली नाही. यामुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, विराट कोहलीला मालदीवमधून परतल्यावरच कोरोनाची लागण झाली होती.
द्रविड भारतीय संघात सामील झाल्याची बातमी दिल्यानंतर बीसीसीआयने सोशल मीडियावर सात फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये द्रविड खेळाडूंना काहीतरी समजावून सांगत आहे. गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या देखरेखीखाली भारतीय संघाने आधीच लिसेस्टरशायरमध्ये सराव सुरू केला होता. येथे एका आठवड्याच्या सरावानंतर टीम इंडिया २४ ते २७ जूनदरम्यान लिसेस्टरशायर काउंटी क्लबविरुद्ध चारदिवसीय सराव सामना खेळणार आहे.
भारतीय संघाला मिळाली वॉर्निंग !
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामुळे संपूर्ण भारतीय संघाला बोलणी खावी लागली आहेत. तीन दिवसांपूर्वी रोहित आणि विराटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘क्रिकेटमॅन२’ या ट्विटर अकाउंटवर विराट कोहली आणि रोहित शर्माचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोमध्ये दोघांच्याही हातात खरेदीच्या पिशव्या दिसत होत्या. रोहित आणि विराटने लंडनमध्ये एकत्र खरेदी सुरू केल्याचे या फोटोंवरून स्पष्ट दिसत होते. यादरम्यान त्यांनी काही चाहत्यांसोबत फोटोही काढले होते. विशेष म्हणजे दोघांच्याही तोंडाला मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे बीसीसीआय, कोहली आणि शर्मासोबतच संपूर्ण संघाला फटकारल्याचे वृत्त आहे.
त्यानंतर टीम इंडिया १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, जो गेल्या वर्षी कोविड-१९ संसर्गामुळे स्थगित झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना होता. या मालिकेत भारत सध्या २-१ ने पुढे आहे. कसोटीनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये तीन एकदिवसीय आणि तितकीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे.
द्रविडच्या नेतृत्वात केली होती कमाल : भारताने पहिल्यांदा १९७१ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला, तर २००८ मध्ये तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती.