‘त्याने तुला 7 वर्षे डेट केलं म्हणून लगेच लग्न..’ रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल नीतू कपूरची खोचक पोस्ट

मुंबई | अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी आलिया भट्टशी (Alia Bhatt) लग्नगाठ बांधली. लग्न त्यानंतर घरी चिमुकलीचं आगमन यामुळे रणबीर अगदी भारावून गेला. मात्र आलिया भट्टबरोबर लग्न करण्यापूर्वी रणबीरचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्याने कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या अभिनेत्रींना डेट केलं होतं. रणबीरचं इतर अभिनेत्रींशी असलेलं नातं कधीच लपून राहिलेलं नाही. आता पुन्हा एकदा त्याचं खासगी आयुष्य चर्चेत आलं आहे. रणबीरची आई नीता कपूर (Neetu Singh) यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यांच्या या पोस्टचा इशारा रणबीरचे एक्स गर्लफ्रेंड्स दीपिका आणि कतरिना यांच्याकडे असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांना ट्रोल केलं आहे.
शनिवारी नीतू कपूर यांनी रिलेशनशिप आणि लग्नाविषयीची एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सशी लावला. त्यावरून काहींनी नीतू यांच्यावर टीकासुद्धा केली आहे.
