‘गदर 2’ चित्रपटातील ‘त्या’ सीनने कार्तिक आर्यनला लावले वेड; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मला…”

मुंबई | Gadar 2 – ‘गदर 2’ (Gadar 2) हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Amisha Patel) यांचा हा चित्रपट सध्या मोठी कमाई करताना दिसत आहे. ‘गदर 2’नं प्रेक्षकांना अगदी वेड लावलं आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांसोबत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना देखील वेड लावलं आहे. बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जाताना दिसत आहेत. यामध्ये आता अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्यानं चित्रपटगृहात मोठा जल्लोष केला आहे, याचा व्हिडीओ त्यानं स्वत: शेअर केला आहे.
कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गदर 2’ चित्रपटातील एक खास सीन शेअर केला आहे. हा सीन शेअर करत त्यानं म्हटलं आहे की, मी ‘गदर 2’ चा तो सीन सुरू असताना चित्रपटगृहात जल्लोष केला. तारा सिंगचा मी चाहता आहे त्यामुळे मी हा चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. तो सीन या चित्रपटातील आयकॉनिक सीन आहे.
कार्तिकने या व्हिडीओमध्ये ‘गदर’ चित्रपटाच्या पहिल्या भागातील हँडपंपचा सीन शेअर केला आहे. हा सीन शेअर करत कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, हा आयकॉनिक सीन मला खूप आवडतो. सोबत त्यानं ‘ढाई किलो का हाथ..’चं इमोजीही शेअर केलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.