ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, 20 प्रवासी असल्याचा अंदाज; एका महिलेचा मृत्यू

नाशिक | Nashik Bus Accident – नाशिकमध्ये भीषण बस अपघात (Nashik Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला. बसमध्ये अंदाजे 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे. पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून मंगळवारी सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला. बस थेट 400 फूट दरीत कोसळली.

बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली होती. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या घटनेबाबत माहिती कळताच बचाव पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी रुग्णालयात नेले जात आहे. या घटनेत किती लोक जखमी आहेत, किती मृत आहेत. याबाबत आकडा अद्याप समजू शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये