चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

पुणे : भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसंच महाराष्ट्रात भारनियमन सुरु आहे. त्यास कोळसा टंचाई कारणीभूत आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र आता वीजेवरुन राजकीय नाट्य सुरु झाल्याचे दिसत आहे. नागपूर येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सभा पार पडली. या सभेसाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणतात, गुरुवारी नागपुरात शिवसेनेच्या सर्वज्ञानींची भरलेली सभा चोरीच्या विजेतून झाल्याचं समोर आलं आहे.
आता पक्षांतर्गत चौकशीची सारवासारव केली जात आहे. चोरीचा मामला सेना भवनातच बोंबला, अशी टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राऊत यांची गुरुवारी नागपूर येथील गजाजन परिसरात सभा पार पडली. या प्रसंगी ते म्हणाले, नागपूर महापालिकेत घोटाळा करणारे तुरुंगात जातील.