ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? जावेद अख्तर म्हणाले, “तेव्हा सगळे मुस्लीम…”

मुंबई | Javed Akhtar – गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानातील (Pakistan) एका महोत्सवात हजेरी लावली होती. या महोत्सवात त्यांनी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यांच्याच देशात जाऊन त्यांना आरसा दाखवल्यानं भारतीयांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर आता भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं चूक होती का? असा प्रश्न विचारण्यात आला.

जावेद अख्तर यांनी ‘एबीपी न्यूज’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानामध्ये केलेलं वक्तव्यं आणि भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल भाष्य केलं. तसंच सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहिल्यावर पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न अख्तर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

जावेद अख्तर म्हणाले की, “मला असं वाटतं की माणसानं केलेल्या सर्वात मोठ्या 10 चुका, या नावानं एक पुस्तक लिहिलं गेलंय, त्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती असेल. पाकिस्तानची निर्मिती ही कारण नसलेली होती. जे आता झालंय ते सत्य आपण स्वीकारायलाच हवं. पण, जे झालं ते बरोबर नव्हतं. धर्म कधीच कोणता देश बनवत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की तो संपूर्ण देश बनवू शकेल. तसं तर मग इटली आणि युरोप धर्मावर आधारित देश असते. जर तुम्ही एखादा देश धर्मावर आधारित बनवण्याचा विचार केलात, तर ते कांद्यावरील सालीसारखं आहे.”

“सध्याच्या पाकिस्तानमध्ये शिया मुस्लीम नाहीत, अहमदिया मुस्लीमही नाहीत. जेव्हा फाळणी झाली, तेव्हा हे सगळे मुस्लीम होते, पण आता नाहीत. या सर्व गोष्टी हळूहळू नाहिशा होत आहेत. आपणही आता तीच चूक करण्याच्या मार्गावर आहोत, जी त्यांनी 70 वर्षांपूर्वी केली होती”, असंही जावेद अख्तर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये