क्राईमक्रीडाताज्या बातम्या

आयपीएल गाजवलेल्या ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक

भोपाळ | Indian Cricketer Father Arrested – टीम इंडीयाचा माजी क्रिकेटपटू आणि यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. फलंदाज नमन ओझाच्या वडिलांवर ५० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. ६ जून रोजी नमन ओझाच्या वडिलांना मध्य प्रदेशातील बैतुल येथील मुलताई येथून अटक करण्यात आली आहे. विनय ओझा हे जौलखेडा गावात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या शाखेत कार्यरत होते. तत्कालीन बँक व्यवस्थापकावर फसवणुकीसह इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. तसंच फसवणूक आणि इतर अनेक अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत होती अखेर ६ जून रोजी त्यांना बैतुल येथील मुलताई येथून अटक करण्यात आली आहे.

एसडीओपी नम्रता सोंदिया यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओझिया यांना एक रिमांडमध्ये घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. २०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तैनात असलेले जौैलखेडा बँक व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनय ओझा आणि आणखी अशा तिघांनी मिळून बनावट नाव आणि फोटोच्या आधारे किसान क्रेडीट कार्ड बनवून बँकेतून पैसे काढले होते. तरोडा येथील रहिवासी दर्शन याने वडील शिवलू यांच्या निधनानंतरही त्यांच्या नावावर खाते उघडून पैसे काढले होते. तसंच अन्य शेतकऱ्यांच्या नावे किसान क्रेडिट कार्ड बनवून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये काढण्यात आले.

बँकेतून रक्कम काढल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनय ओझा, लेखापाल नीलेश चलोत्रे, दीनानाथ राठोड आदींनी रक्कम वाटप केली. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक रत्नम, विनय ओझा, नीलेश चलोत्रे आणि इतरांविरुद्ध कलम ४०९. ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० बी, ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५, ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विनय ओझा फरार झाले होते. पण त्यांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये