क्राईमपुणेराष्ट्रसंचार कनेक्ट

तरुणावर टोळक्याने केले वार!

कुमठेकर रोडवर धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील टिळक रोड व जोंधळे चौक येथे ६ ते ७ जणांच्या टोळक्यांनी नागरिक व तरुणांवर कोयत्या व दगडाने मारहाण केली आहे. यात ३ गंभीर जखमी व एका पोलिसांवरही हल्ला झाला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शुक्रवारी दुपारी पुण्यातील कुमठेकर रोडवर एक धक्कादायक घटना घडली.

टिळक रोड व जोंधळे चौक येथे ६ ते ७ जणांच्या टोळक्यांनी नागरिक व तरुणांवर कोयत्या व दगडाने मारहाण केली आहे. यात ३ गंभीर जखमी व एका पोलिसांवरही हल्ला झाला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.पुण्यातील सिंहगड परिसरातून ६ जण हे रिक्षातून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या कुमठेकर रोडवर आले.

तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टिळक रोडवर आले आणि तिथे उभे असलेल्या एका नागरिकाला कोयत्याने मारहाण केली. असे एकूण ३ जणांवर हल्ला केला. घटनास्थळी पोलिस पकडण्यासाठी गेले असता एका कर्मचार्‍याला देखील चावा घेतला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये