देश - विदेश
गुजरातमधील पूल कोसळलेल्या दुर्घटनेतील ग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
GUJARAT MACHCHHU RIVER POOL COLLAPSE : गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवर बांधलेला ओव्हरब्रिज कोसळल्याने 500 हून अधिक लोक नदीत पडले आहेत. स्थानिक लोक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. हा पूल एक स्थानिक पिकनिक स्पॉट आहे जिथे शनिवार व रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. दरम्यान दुर्घटना ग्रस्तांना राज्य आणि केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सरकारकडून अपघात ग्रस्तांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेतील प्रत्येक मृतकांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, घटनेत जखमी झालेल्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.