स्वशैलीचा ठसा मराठी साहित्य विश्वात उमटवला

कथाकार जी.ए.कुलकर्णींची अभिव्यक्ती उत्तुंग होती..
पुणे : ज्या पद्धतीने गायकाला स्वर दिसतात तसेच जी.ए. ना रंग ऐकू येत असावेत. जी.ए.च्या चित्रकलेचा आस्वाद घ्यायवयाचा झाल्यास त्यांच्या साहित्यिक प्रतिमांचा आढावा आपणास घ्यावा लागेल. जी.एं.च्या मनात बहुदा अभिव्यक्तीचा झगडा सुरु असावा म्हणून ते कदाचीत या माध्यमाकडे वळाले असतील, असे मत प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी व्यक्त ृकेले.
श्रेष्ठ कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्माशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्षरधारा बुक गॅलरी आणि जी.ए.कुलकर्णी कुटुंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जी.एं.नी खाटलेल्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कुलकर्णी बोलत होते. यशंवतराव चव्हाण कलादालन येथे भरविण्यात आलले हे प्रदर्शन आजपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी आस्वादासाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनाच्या उदघाटन वेळी जी.ए.कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, पू.ना.गाडगीळ पेढीचे अजित गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंंद जोशी, माजी संमेलनाध्यक्षा डॉ.अरुणा ढे, प्रसिद्ध चित्रकार रवि मुकुल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले, अभिव्यक्तीसाठीचे अजून एक माध्यम म्हणून जी.ए. चित्रकलेकडे वळले असावेत. त्यांचा अबोल स्वभाव लक्षात घेता त्यांना चित्र का काढावशी वाटली हा त्यांच्या साहित्या इतकचा गूढ प्रश्न रसिकांना
पडलेला आहे. बेळगावमधील छोट्याशा घरात त्यांनी त्यांची ही चित्रकलेची कला जोपासली. जी.एं.चा चित्रकलेचा प्रवास हा त्यांच्या साहित्यिक प्रवासा एवढाच खडतर होता. अभिव्यक्त होण्यासाठी जी.एं. सारखा साहित्यिक शब्द हे माध्यम असतांना चित्रकला या दुस-या अभिव्यक्तिच्या माध्यमाकडे का वळला असेल, हे गुढ आहे. जी.एं.ची अभिव्यक्ती उत्तुंग होती.
कदाचीत काही भावना व्यक्त व्हायला शब्द अपु पडत असतील म्हणून जी.ए. चित्रकलेकडे वळले असतील. मात्र, जी.ए. चित्रकले पेक्षा शब्द या माध्यमात अधिक रमले. यावेळी बोलताना अजित गाडगीळ म्हणाले की, जी.एं.च्या चित्रातून गूढमय रम्यता प्रदर्शित होते. त्यांच्या लेखणीची जशी वेगळी शैली होती तशी वेगळी आणि हटके चित्रकला शैली त्यांच्या चित्रातून दिसून येते. चित्रकला हा जी.एं.च्या व्यक्तीत्वाचा दुसरा पैलू होता. यावेळी जी.ए.कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी देखील जी.एं.च्या चित्र प्रवासावर प्रकाश टाकला. आपल्यावेजळ्या लेखन शैलीने जी.ए.कुलकर्णी यांनी स्वत:च्या शैलीचा एक ठसा मराठी साहित्य विश्वात उमटवला आहे. ‘मराठी कथा विश्वातील ‘माऊंट एव्हस्ट’ अशा शब्दात पु.ल.देशपांडे यांनी जी.ए. कुलकर्णी यांचा गौरव केला होता.