ताज्या बातम्यामनोरंजन

केरळच्या 32 हजार बेपत्ता महिलांची कहाणी सांगणारा ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर रिलीज

The Kerala Story Trailer : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. द केरळ स्टोरीच्या या ट्रेलरमध्ये मुलींचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादाकडे ढकलण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना आयएसआयएसच्या दहशतवादी बनवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. केरळमध्ये मुलींचे धर्मांतर कसे होते. हिंदू कुटुंबातील शालिनी ही फातिमा कशी बनते, याची हादरवणारी गोष्ट या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण करण्यात आले होते. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलं होतं. या मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असे सांगण्यात येत आहे. 5 मे रोजी प्रदर्शित होणारा हा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट सुदिप्तो सेन यांनी बनवला आहे. तर विपुल शाह या चित्रपटाचे निर्माते आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी आणि सिद्धी इदनानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये