UP मध्ये ‘द केरळ स्टोरी’ होणार करमुक्त; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
The Kerala Story : दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटावरून बरेच वाद आहेत. अनेक राज्यांतून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असून मोठा विरोध अजूनही होत आहे. पण काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात करमुक्त करण्यात आला. आता लवकरच उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात येणार आहे. याबाबत उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एक ट्वीट शेअर करुन घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाने सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे होणाऱ्या विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात. उत्तर प्रदेश राज्यात अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट देखील करमुक्त करण्यात आला होता. तसेच यूपीमधील भाजपचे सचिव राघवेंद्र मिश्रा यांनी नुकताच लखनऊमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवला.