‘रुबी रुग्णालयाच्या रॅकेट’ प्रकरणात नवीन ट्विस्ट; प्रकरणातील आरोपींच्याही किडनी गायब
पुणे : काहीच दिवसांपूर्वी समोर आलेल्या रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरणातील मध्यस्थी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या दोघांबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक केलेल्या दोघांनाही एक एक किडनी नसल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. त्या दोघांनीही पैशांच्या आमिषाने मूत्रपिंड दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.
काही दिवसांपूर्वी किडनी प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचे अमिष दाखवून किडनी प्रत्यारोपण झाल्यांनतर पैसे मिळाले नसल्याचा खळबळजनक आरोप सारीका गंगाराम सुतार यांनी केला होता. त्यांनतर या प्रकरणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे डॉ. संजोग सीताराम कदम यांनी याविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यात पैशाच्या आमिषाने मूत्रपिंड देणाऱ्या महिलेसह मध्यस्थी आणि रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांवर गुन्हा करण्यात आला.
त्यांनतर अभिजित गटणे आणि रवींद्र रोडगे या दोघांना या प्रकरणात मध्यस्ती करण्यासाठी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तपासणीनंतर त्याच्या कंबरेच्या बाजूला शस्त्रक्रियेचे व्रण असून त्यांनीही पैशासाठी किडनी दिलेली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आरोपींच्या शरीरावर शस्त्रक्रियेचे व्रण दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांची सोनोग्राफी केल्यांनतर याची खात्री करण्यात आली. पुढील तपस सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिलेलं आहे.