‘…कोल्हापूरची जनता नक्कीच भाजपाला आपला आशीर्वाद देईल’- चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : आज सकाळपासून ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. यादरम्यान, निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागेलेले दोन दिग्गज नेत्यांची एकमेकांविरोधातील टोलेबाजी सुरु झाली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सध्या एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणाले, आज अतिशय उत्साहाने मतदान सुरू आहे. आज सकाळपासून मतदासाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कोल्हापूरची जनता नक्कीच भाजपाला आपला आशीर्वाद देतील, यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि मालोजीराजे छत्रपती हे दोन्ही नेते आठ नंबर शाळेतील मतदान केंद्रासमोर एकत्रित आले. यावेळी दोघांनी गळा भेट घेतली. मात्र यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण केले यानंतर चंद्रकांत पाटील निघून गेले आहेत. पोलिस या ठिकाणी आल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले. मालोजीराजेंना धक्का लागू नये म्हणून कार्यकर्ते पुढे आले. यामुळे तणावात काहीशी भर पडली. अखेर मालोजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना आणि पोलिसांना शांत केले.