पुण्यातील पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच!

पुणे | Pune News – पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका कधी जाहीर होणार, याबाबत राज्यात चर्चा रंगल्या आहेत. मात्र पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. निधनानंतर पुढील निवडणुकीला एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असेल तर निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला अनिवार्य असते, मात्र काही अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करूनही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनानंतर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांच्या जागा रिक्त होत्या. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदारसंघांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याचे आता
समोर आले. अपवादात्मक स्थिती आणि कार्यकाळ ही दोन कारणे निव़डणूक आयोग देऊ शकतात आणि पोटनिवडणूक टाळू शकतात.