‘या’ दिवशी जाहीर होणार दहावी, बारावीचे निकाल; शिक्षणमंत्री बच्चू कडूंनी दिली माहिती

मुंबई | Bacchu Kadu | आज एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याशी खास संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने बातचित केली. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र बोर्ड दहावी, बारावीच्या निकालांबाबत (10 th, 12 th Results) महत्वाची माहिती दिली. बोर्डाचे निकाल येत्या १० दिवसात जाहीर करू असं ते म्हणाले. तसंच निकाल उशीरा लागल्याने त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले.Bacchu Kadu
बच्चू कडू यांनी दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “दहावीचे, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसात जाहीर करु. जरी उशीर झाला तरी, दहावीनंतरची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करू.” तसंच २० जूनपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर होतील का असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “शक्यता आहे मी निश्चीतपणे सांगू शकत नाही. पण २० जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.”
“उशीर झाला तरी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करू. कोरोना (Corona) काळात काही गोष्टींची उणीव नक्की राहिली. पण तरीही देशाच्या एकंदरीत गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी दुर्गम भागामध्ये जात अनेक प्रयोग करून विद्यार्थांपर्यंत शिक्षण (Education) पोहचवलं”, असंही बच्चू कडू म्हणाले.