भारतापुढे वाढत्या बेरोजगारीचे गंभीर आव्हान

विश्व लोकसंख्या दिनानिमित्त घेतलेला आढावा
मुस्लिमांच्या मानसिकतेतून लोकसंख्या वाढीचा ेंड ?
भारतात मुस्लिम वेगाने लोकसंख्या वाढवत आहेत आणि असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत भारत एक मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्र बनेल. मुस्लिमांमधील उच्च सरासरी जन्मदर हा केवळ धर्माचा मुद्दा नाही तर त्यामागे इतर अनेक कारणे आहेत-जसे की गरिबी आणि निरक्षरता.
पुणे : सन १९८९ मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमाच्या गव्हनिर्ंग कौन्सिलनेे ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. हे विचारमंथन आजदेखील भारतात आवश्यकच आहे. पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या मृत्यूचा दर जास्त होता त्यामुळे पाच मुले झाली तरीही त्यातील दोन तरी मरतील हे गृहीतच होते. त्यामुळे आधीच सावधानता लक्षात घेऊन ‘एकतरी वाढता घ्यावा’ याचा विचाराने लोकं भविष्यातील तरतूद करून ठेवत.
शिवाय मुलगा हवा हा हट्ट आजही आहे तर त्याकाळीसुद्धा होताच होता. त्यामुळे जरी पहिल्या चार मुली असल्या तरीही आपला वंश चालवण्यासाठी मुलगा पाहिजेच हा विचार बदललेला नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्र्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन २०२५ पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा १७ टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त २.४ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमा १.८ कोटींची भर पडते. या वेगाने २०५० पर्यंत भारतीय लोकसंख्या १५३ कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या १३९ कोटी असेल. लोकसंख्या आणि एनएफएचएसचे आकडे हे दाखवतात की भारतात खराब आर्थिक अवस्था आणि शिक्षणाचे कमी प्रमाण असलेले लोक जास्त मुलांना जन्म देतात. यामागे अनेक कारणे असतात. गरीब कुटुंब असल्यामुळे जितकी मुलं जास्त तितके काम करणा लोक जास्त अशी मानसिकता असते. ही मानसिकता अनेक मुलांना जन्म देण्याचे कारण बनते.