राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

पुण्याच्या झोपडपट्ट्या होणार चकाचक!

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

पुणे महापालिकेच्या हद्दीत ३९० अधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि झोपड्यांची संख्या १लाख४०हजार८४६ इतकी आहे. या झोपड्यांमध्ये ७ लाख ४० हजार १८० रहिवासी राहातात. २०११ सालच्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार ८२४ एवढी आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता २८ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत आहे. झोपडपट्ट्यांचे सौंदर्यीकरण हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तो सोडविण्याचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले आहे.

पुणे : शहरातील झोपडपट्ट्या सुंदर आणि स्वच्छ करण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. महापालिकेने स्वनिधी वापरून हे अभियान यशस्वी करावे, असा आदेश सरकारने जारी केला आहे. झोपडपट्ट्या सुशोभीकरणात अभियांत्रिकी आणि कला महाविद्यालये आणि विकासक यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात संपूर्ण शहराचेच सौंदर्यीकरण अभिप्रेत असल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने झोपडपट्ट्या आणि गावठाणे यामध्ये प्राधान्याने काम करावे असे म्हटले आहे. शहराच्या पर्यावरण अहवालातील झोपडपट्टीवासीयांची संख्या पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. झोपडपट्टीवासीयांना नव्या स्वरूपाची घ देण्याची मोहीम चालूच आहे, त्याला वेग द्यावा लागेल.

कोविड साथीच्या काळात तिथे आरोग्यसेवा पुरविताना धावपळ उडाली होती. तेथील अनारोग्याच्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी झोपडपट्ट्या चकाचक, सुंदर करण्याचे अभियान राज्य सरकार राबवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये