पुणेराष्ट्रसंचार कनेक्ट

जुन्या-नवीन म्हाडात पाण्याचा ठणठणाट

लहान लेकरांना कडेवर घेऊन पाण्यासाठी महिलांची कसरत

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने वैदूवाडी, गोसावीवस्ती, जुन्या- नवीन म्हाडा कॉलनीतील नागरिक सैरभैर झाले. पाण्याचा टँकर आल्यानंतर अक्षरशः नागरिकांनी टँकरवर चढून पाणी भरण्यासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिक, लहान लेकरांना कडेवर घेऊन महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. पालिका प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. तीन दिवसांपूर्वी वैदूवाडी रेल्वे गेटपासून सोलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे पाणी मिळत नाही.

पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी रामटेकडी येथे म्हणजे उशाला असूनही पाणी मिळत नाही. कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने मोटार लावून पाणी घ्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना म्हाडाच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर पाणी न्यावे लागते.
— रसिदा खान स्थानिक नागरिक

मात्र, एरव्हीसुद्धा कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, असे महात्मा फुलेनगर, खजुरेवस्ती, मातंगवस्ती, मार्केंडेयनगर, वैदूवाडी, गोसावीवस्ती, बिराजदारनगर, स्वप्नपूर्ती, सोसायन, साई सोसायटी, जुनी-नवीन म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, समर्थनगर, गोपाळवस्ती, कोकणेवस्ती, सार्थक सोसायटीतील नीलम चव्हाण, करुणा प्रक्षाळे, सलीमा सय्यद, नीमा वाघेला, राम कांबळे, बिल्की शेख यांनी सांगितले. तीन दिवसांपासून पिण्यासाठी मगरपट्टा, हडपसर परिसरातून सायकलला कॅन लावून पाणी आणतो.

ज्येष्ठ, महिलांनी पाणी कोठून आणि कसे आणायचे. नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. म्हाडा वसाहत रामटेकडी येथील टँकर पाणीभरणा केंद्रावरून थेट नागरीवस्तीमध्ये १०-१२ पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. पाण्यासारखा जीवनावश्यक घटकासाठी नागरिकांना लढाई करावी लागणे अत्यंत नींदनीय आहे. तीन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटली असल्याने पाणी टंचाई जाणवू लागली. प्रशासनाने तातडीने जलवाहिनी दुरुस्त करून सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी दिले पाहिजे. ‘म्हाडा कॉलनी

दरम्यान, लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल भाटकर म्हणाले की, जुनी जलवाहिनी जीर्ण झाली असून, ती फुटली आहे. त्याचे साहित्य मिळत नाही, ते फॅब्रिकेशनमधून बनवून घेतले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये