ताज्या बातम्यादेश - विदेश

‘WhatsApp’वर बंदीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे (आयटी नियम) पालन करण्यास नकार दिल्याने व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.१४) फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.

याचिकाकर्ते, ओमानकुट्टन के. जी. यांनी यापूर्वी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन न केल्यास केंद्र सरकारने व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, २०२१ (आयटी नियम) यांना व्हॉट्सॲपने दिल्ली न्यायालयात आव्हान दिल्यानंतर ओमानकुटन यांनी ही याचिका दाखल केली होती. तेव्हा केरळ उच्च न्यायालयाने जून २०२१ मध्ये ती जनहित याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये