बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ठाकरेंना कुटुंबाला दिलासा! याचिकाकर्त्या गौरी भिडेंना 25 हजारांचा भूर्दंड

मुंबई : (Gauri Bhide On Thackeray Family) उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे कुटूंबियांवर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप करत याविरोधात गौरी भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने भिडे यांची ही याचिका फेटाळून लावत, गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ही ठोठावला आहे.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करणारी याचिका गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केली होती. याचिका दाखल केली परंतु त्यामध्ये काही पुरावे नाहीत. आम्ही ही याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग मानतो असं म्हणतं मुंबई हायकोर्टाने भिडे यांना मोठी चपराक दिली आहे.
गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात त्यांनी 11 जुलै 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रारही दाखल केली होती.
उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. 22 नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडेंची नव्या खंडपीठापुढे धाव घेतली होती.