सिटी अपडेट्स

पदस्पर्श दर्शन रांगेत बदल व्हावा

नीलमताई गोर्‍हे यांच्या सूचना

पुणे : विठ्ठल-रुमिणीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या पायाची धुळ माझ्या समाधीवर पडावी अशी इच्छा संत नामदेवांनी व्यक्त केली होती, त्याप्रमाणे दर्शनासाठी भाविक जात होते. मात्र मंदिर समिती स्थापन झाल्यावर त्यांनी दर्शन रांगेत बदल करून संत नामदेवांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले. आता मंदिर समितीने पदस्पर्श दर्शन रांग संत नामदेव पायरीवरून सुरू करावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली.

संत तुकाराम भवन येथे गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, पुरातन विभागाचे प्रदिप देशपांडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
मंदिर समितीने आयोजित केलेल्या बैठकीबाबत नीलम गोर्‍हे यांनी नाराजी व्यक्त केली.

पुन्हा अशा पद्धतीची बैठक घेऊ नका, वेगळ्या पद्धतीने नियोजन करा, असे सांगून त्या म्हणाल्या, दोन वर्षापूर्वी पुरातन विभागाने विठ्ठल-रुमिणी मुर्तीवर सिलीकॉन वज्रलेप केला होता. हा लेप ८ ते १० वर्षे टिकतो, मात्र यासाठी पुरातन विभागाने केेलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले होते, मात्र याकडे मंदिर समितीने दुर्लक्ष केल्याने दोन वर्षात वज्रलेप निघाला. यात दोषी कोण याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने अहवाल दिल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.

गोर्‍हे म्हणाल्या, विठ्ठल मंदिराचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी शासनाने ७३ कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे, याचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्यांदा कोणते काम करावयाचे याचा प्रस्ताव मंदिर समितीने द्यावा. शासनाची मंदिर समिती स्थापन होण्याआगोदर संत नामदेव पायरी येथून दर्शन रांग होती. विठ्ठल-रुमिणी मुर्तीची झीज होऊ नये म्हणून मुर्तीच्या चरणावर दुसर्‍या पादूका ठेवण्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे गोर्‍हे म्हणाल्या

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये