पुणेसिटी अपडेट्स

… म्हणून पुण्यात भाजपाचे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन, केंद्रीय गृह सचिवांकडे करणार तक्रार

पुणे : पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्तिथ होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी वाढत्या महागाई विरोधात निषेध व्यक्त केला. तसंच राष्ट्रवादीकडून घोषणा पण करण्यात आली. त्यानंतर आज भाजपकडून अलका चौकात आंदोलन करण्यात आलं आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.

जगदीश मुळीक म्हणाले की, जेव्हा पासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं आहे तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून गुंडागर्दी सुरु आहे यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतोय आणि आपण बघितलंच असेल स्मृती इराणीच्या कार्यक्रमात घुसून गोंधळ घालण्यात आला या प्रकाराचा आम्ही निषेद करतो. तसंच मुळीक यांनी त्यावेळी प्रश्नही उपस्थित केला की, जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येतं असेल ना निवेदन देण्यासाठी आलो होतो तर मग अंडी,बांगड्या कशासाठी आणल्या होत्या.

तसंच आमच्याच कार्यक्रमात येऊन राष्ट्रवादीच्या महिलांनी गोंधळ घातला आणि आमच्याच पदाधिकाऱ्यांवर विनयभंग सारखे गुन्हे दाखल केले आहे. हे गुन्हे माघारी घ्यावेत अशी मागणी ही मुळीक यांनी आंदोलना दरम्यान केली. यामुळे आमच्या अनेक कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तसंच आमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिले सोबत जे घडले, त्याचे आम्ही समर्थन करीत नाही असं ही मुळीक म्हणाले.तर आम्ही केंद्रीय गृह सचिवांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये