‘या’ पक्षानं केला प्रशांत किशोर यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप…
नवी दिल्ली : गोवा तृणमूल काँग्रेसचे माजी अध्यक्ष किरण खांडोलकर यांनी प्रशांत किशोर यांच्यावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर खांडोलकर यांनी बोट ठेवलं आहे. प्रशांत यांच्यामुळं गोव्यात तृणमूलची मत फुटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने पहिल्यांदाच गोव्यात निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यावर बोट ठेवत हा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीनं २० जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली. गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे माजी अध्यक्ष किरण खंडोलकर यांनी बिहारमधील रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यावर आरोप केले आहेत. प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना ब्लॅकमेल केलं होतं, त्यामुळेच गोव्यातील निवडणुकांमध्ये मत फुटले आणि काँग्रेसचा पराभव झाला असा आरोप त्यांनी केला आहे.
किरण खांडोलकर यांनी आरोप करत प्रशांत किशोर हे अध्यक्ष सेनिया गांधी यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच गोव्यात आले होते आणि त्यासाठीच त्यांनी गोव्याचं उदाहरण देत वापर केला आहे. जर तुम्ही मला काँग्रेसमध्ये घेतलं नाही तर आपलं मतदान कमी होईल असंही प्रशांत किशोर यांनी त्यावेळी सांगितलं होतं असा आरोप खांडोलकर यांनी केला आहे.