ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडून…”, ‘लव्ह जिहाद’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया

नाशिक | Sanjay Raut – श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हत्येनंतर आरोपी आफताब पुनावालाच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसंच राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे देखील काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकरांनी लव्ह जिहादच्या आरोपावर प्रश्न विचारला. यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “सर्वांनी या विषयावर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या ही अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.”

https://twitter.com/PravinSindhu/status/1598995437989801984

“मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यामध्ये जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये