Top 5इतरताज्या बातम्यादेश - विदेश
तिबेटमध्ये भूकंपाने हाहाकार
नेपाळ : साखरझोपत असतानाच नेपाळ-तिबेट बॉर्डरजवळ भूकंपाचे तीव्र हादरले बसले. एका तासाच्या अंतरात एका मागून एक सहा भकूंप झाले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (USGS), नेपाळ-तिबेट सीमेजवळ लोबुचेच्या 93 किलोमीटर ईशान्येला सकाळी 6:35 वाजता भूकंप झाला. त्याची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांनी जीव गमावल्याचे समोर आलेय. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या आहेत. सकाळी ६.३५ वाजता ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, नेपाळपासून सुमारे 93 किमी ईशान्येस तिबेटमधील लोबुचे हे भूकंपाचा केंद्र असल्याचे समोर आले.