मोदी साहेबांना पुरस्कार?

पुरस्कार मिळाल्यानंतर अंगात वीरश्री संचारते. रोम रोम पुलकित होतो. तसं मोदी साहेबांनी चांगलंच काम केलं. जी कामं दर पाच वर्षांनी राजकारण्यांच्या निवडणुकीचा विषय होता. पहिलं काम म्हणजे कलम तीनशे सत्तर. ते काश्मीरचे कलम रद्द करून त्या स्वतंत्र काश्मीरला भारतीय राज्यात जोडलं व नेहमीची कटकट मिटवली.
पुरस्काराबाबत सांगायचं झाल्यास काहीजणांना वारंवार पुरस्कार मिळत असतात, तर काहीजणांचं फार काम असूनही त्यांना पुरस्कार मिळत नाहीत. तसं पाहाता पुरस्कार देताना अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना परस्पर पुरस्कार द्यायला हवेत की जेणेकरून त्या लोकांच्या केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळेल, परंतु आपण तसे करीत नाही. आपण जो आपल्याला प्रस्ताव पाठवतो, त्यालाच आपण पुरस्कार देतो.
काही काही पुरस्कार तर सौदेबाजीचेच असतात. सौदेबाजी म्हणजे आज तुम्ही आम्हाला पुरस्कार द्या. उद्या आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ किंवा आम्हाला अमुक एवढी रक्कम दान म्हणून द्या. आम्ही आपणाला पुरस्कार देऊ. याचाच अर्थ असा की, पुरस्कारात स्वार्थ. त्याच्याकडून मला वा माझ्या संस्थेला कोणता लाभ होणार? यावरून पुरस्काराबाबतचे स्वरूप ठरत असते. ज्याला पुरस्कार दिला जाणार तो किती पोहोचलेला आहे हे पाहून जर त्याला पुरस्कार मिळाल्यास आमचेही नाव साहजिकच मोठे होणार हे लक्षात घेऊन पुरस्कार दिला जातो. त्या व्यक्तीला पुरस्कार दिल्यास साहजिकच संस्थेचे नाव मोठे होत असते. मग त्या व्यक्तीनं प्रस्ताव नाही पाठवले तरी ती संस्था त्या माणसाचे प्रस्ताव स्वतःच तयार करीत असते.
लाभ आणि स्वार्थ लक्षात घेऊन, परंतु समाजात असेही बरेच लोक आहेत की, जे फक्त कार्य करतात, परंतु पुरस्काराची अपेक्षा ठेवत नाही. ते आपल्याला पुरस्कार मिळायला हवा याची आशाही करीत नाहीत आणि तसे प्रस्तावही पाठवीत नाही. परंतु काही लोकांचं म्हणणं असतं की, बाळ रडल्याशिवाय त्याला आई दूध पाजत नाही. म्हणूनच बाळानं आधी रडायला हवं. तसं पुरस्काराचंही आहे. जेव्हापर्यंत कोणी प्रस्ताव पाठवीत नाहीत, तेव्हापर्यंत पुरस्कार मिळत नाहीत.
काही तर एवढे हपापलेले असतात पुरस्कारासाठी की, त्यांचं असं विशेष कार्यही नसते. तरीही ते इकडून तिकडून आपल्या कार्याची पावती गोळा करून ती पावती प्रस्तावासोबत पाठवतात. कधीकधी पैसेही मोजतात आणि पुरस्कार खेचूनच आणतात असे बरेचजण आहेत. अर्थातच खोटे प्रमाणपत्र तयार करणे. खोट्या बातम्या छापून आणून ती कात्रणं गोळा करणे. इत्यादी गोष्टी आजकाल सर्वत्र घडत आहेत.
आज प्रत्यक्ष पडताळून पाहिलं असता बरेचजण असे आढळून येतात की, जे नावासाठी कार्य करीत असल्याबाबतचे फोटो काढतात व ते फोटो काढले की, व्हॉट्सअपवर टाकतात. प्रसारमाध्यमांतून प्रसारित करतात. असे बरेच आहेत. तीच मंडळी पुरस्कारासाठी प्रस्तावही पाठवीत असतात. खरा पुरस्कारार्थी हा प्रस्ताव पाठवीत नाही. त्याला पुरस्काराची गरज नसते. त्याचा पुरस्कार त्याचं कार्य बोलतं. त्यानं केलेलं कार्य हे आपोआपच जगाला दिसतं.
ते कार्य प्रस्ताव पाठवून कोणाला दाखवायची गरज नसते आणि तो दाखवतही नाही. अशातच पुरस्कार देण्यासाठी शोध घेण्याची गरज असते, परंतु आपण कोण त्रास घेईल असा विचार करून प्रस्ताव मागवतो व पुरस्कार प्रदान करीत असतो. अगदी शासनही तसं प्रस्ताव मागविण्याचे कार्य करीत असते. प्रस्ताव तेच पाठवतात, ज्यांचं कार्य काहीच नसतं आणि तरीही त्याला पुरस्कार हवा असतो. त्यालाच दाखवायची गरज असते. ख-या निस्पृह कार्य करणाऱ्यांना नसते. ती मंडळी कर्मण्यवाधिकारस्ते, मा फलेशु कदाचन अर्थात कर्म करा व फळाची अपेक्षा करू नका याप्रमाणेच वागत असतात.
दि. ११/०७/२०२३ ची बातमी. पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार. एका प्रसिद्ध दैनिकातील बातमी आणि हा पुरस्कार मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत. तसं पाहता शरद पवारांनी ते निमंत्रण स्वीकारले, असंही म्हटलं आहे. हा पुरस्कार लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे दिला जाणार आहे. यावर्षी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची एकशेतीनवी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त हा उत्सव आहे.
पुरस्कार मिळायला हवा. तसं पाहता पुरस्कार हा चांगल्या कामाची पावतीच. पुरस्कार मिळाल्यानंतर अंगात वीरश्री संचारते. रोम रोम पुलकित होतो. तसं मोदी साहेबांनी चांगलंच काम केलं. त्यांनी काही महत्त्वाची कामं केली की, जी कामं दर पाच वर्षांनी राजकारण्यांच्या निवडणुकीचा विषय होता. पहिलं काम म्हणजे कलम तीनशे सत्तर. ते काश्मीरचे कलम रद्द करून त्या स्वतंत्र काश्मीरला भारतीय राज्यात जोडलं व नेहमीची कटकट मिटवली. त्यातच मिटवला तो आतंकवाद. ज्या आतंकवाद्यांच्या आतंकवादानं देशात जागोजागी बॉम्बस्फोट होत होते. आता तो मुद्दा उरलाच नाही. दुसरा मुद्दा आणि तोही महत्त्वपूर्ण मुद्दा
म्हणजे राममंदिर.