जाणून घ्या पुण्यातील आजचे सोन्याचे दर !

Pune Gold Rate : देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही (Gold Price) कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा 62721रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात आज (8 मे) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 62721 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57494 रुपये प्रती तोळा इतका आहे. रविवारपेक्षा पुण्यातील सोनं महाग झालं आहे.

आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6272 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5749 इतकी आहे.

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

पुण्यातील चांदीची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. येथे आजचा चांदीचा दर 77700 रुपये प्रती किलो आहे.