ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

धक्कादायक! मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून तरूणानं मारली उडी, पाहा नेमकं झालं काय

मुंबई | Mumbai News – एका तरूणानं मंत्रालयातच (Maharashtra Mantralaya) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना तरूणानं मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, सुदैवानं तो तरूण मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकला आणि त्याचा जीव वाचला. मंंत्रालयात याआधीही आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे ही संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाचं नाव बापू नारायण मोकाशी असं आहे. हा तरूण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. आज दुपारच्या सुमारास त्यानं मंत्रालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत तो अडकला आणि त्याचा जीव वाचला.

दरम्यान, पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतलं असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठवलं आहे. रूग्णवाहिकेतून नेत असताना त्याला आत्महत्येचं कारण विचारण्यात आलं असता त्यानं प्रेयसीवर बलात्कार झाला असून न्याय मिळाला नसल्याचं सांगितलं. तसंच याप्रकरणी आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये