ताज्या बातम्यामनोरंजन

“शिझान व त्याच्या कुटुंबियांनी माझ्या मुलीवर…”, तुनिषाच्या आईचे गंभीर आरोप

मुंबई | Tunisha Sharma – 24 डिसेंबरला प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं (Tunisha Sharma) आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिषानं अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाला तिचा बाॅयफ्रेंड शिझान खाननं (Sheezan Khan) आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईनं केला होता. या प्रकरणी शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तसंच आता तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषद घेत पुन्हा शिझानवर गंभीर आरोप केले आहेत.

“शिझान खान व त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला होता. मला कुत्रे आवडत नाहीत. तरीही मला सरप्राइज देण्यासाठी सांगितलं”, असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईनं केले आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, “तुनिषा ही खूप भावनिक होती. शिझानपेक्षा दहा वर्षांनी ती लहान होती. त्यानं तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना देखील दुसऱ्या मुलीशी संबंध का ठेवले? शिझानला तुनिषानं 25 हजारांचे गिफ्ट्स दिले होतं. त्यांनी तिचा उपयोग करुन घेतला. तुनिषानं आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी मी सेटवर गेले होते. तेव्हा मी शिझानशी बोलण्याचा प्रयत्न केला. सॉरी, आता काहीही होऊ शकत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, असं शिझान मला म्हणाला होता”, असंही तुनिषाच्या आईनं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये