गँगस्टर बिश्नोईला भेटण्यासाठी दोन बहिणी घरातून पळाल्या, तुरूंगाबाहेर पोहोचताच त्यांनी…
चंदिगड | Lawrence Bishnoi – पंजाबमधल्या बठिंडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) भेटण्यासाठी झारखंडमधल्या दोन अल्पवयीन मुली घरातून पळून आल्या आहेत. तसंच त्या बठिंडा सेंट्रल जेलबाहेर सेल्फी घेत असताना पकडल्या गेल्या. या दोन्ही बहिणी लॉरेन्स बिश्नोईच्या चाहत्या असून त्या दोघी बिश्नोईला भेटण्यासाठी झारखंडहून बठिंडाला आल्याचं त्यांनी सांगितलं.
या दोन्ही बहिणींना तुरुंगाबाहेर सेल्फी काढून त्यांच्या मित्रांना पाठवायचा होता. त्यामुळे या दोघी गुरुवारी (16 मार्च) लॉरेन्स बिश्नोईला भेटण्यासाठी बठिंडा सेंट्रल जेलच्या बाहेर गेल्या. तिथे गेल्यानंतर त्या दोघी जेलच्या बाहेर सेल्फी क्लिक करत होत्या. त्या दोघींना पाहून तुरुंगाबाहेर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस आणि जिल्हा बाल सुरक्षा विभागाला माहिती दिली.
बठिंडा बाल सुरक्षा अधिकारी रवनीत कौर सिद्धू यांनी सांगितलं की, “या दोन्ही अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांशी खोटं बोलून इथे आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितलं की त्या सहलीला जात आहेत. आम्हाला समुपदेशनानंतर समजलं की, त्या लॉरेन्स बिश्नोईमुळे प्रभावित झाल्या असून त्या तुरुंगाबाहेर केवळ सेल्फी काढण्यासाठी आल्या होत्या.”