ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

उदय सामंत यांच्याकडून I.N.D.I.A ची फोड; टीका करत म्हणाले, “देशाच्या नावाचा…”

मुंबई | Uday Samant – मुंंबईमध्ये आज (31 ऑगस्ट) आणि उद्या (1 सप्टेंबर) विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Alliance Meeting) होणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांचं या बैठकीकडं लक्ष लागून राहीलं आहे. अशातच या बैठकीवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. यामध्ये शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी इंडिया नावाची वेगळीच फोड केली आहे.

उदय सामंत यांनी इंडीया नावाची फोड करत म्हटलं आहे की, खासदारकीची निवडणूक झाली की, I चा अर्थ इंडियन काँग्रेस फुलस्टॉप, N म्हणजे जी NCP त्यांच्याबरोबर आहे ती फुलस्टॉप, D म्हणजे DMK फुलस्टॉप, I म्हणजे इंडियन मुस्लीम लीग फुलस्टॉप आणि A म्हणजे आप आणि बाकी असलेले सगळे फुलस्टॉप.

राजकारणासाठी देशाच्या नावाच उपयोग करणं या एवढं दुर्दैव नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. तसंच भाजपचा पराभव करण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र येत आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीत या सर्व पक्षांचा पराभव होईल आणि महायुतीचा विजय पुन्हा होईल, असा दावाही सामंत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये