ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले; “वरळीसारखं राष्ट्रवादीचा नेता…”,

मुंबई : (Uday Samant On Aaditya Thackeray) शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी राज्यात नवं सरकार आल्यावर वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, ऑरिक सिटीतील मेडिसीन डिव्हाइस पार्क आणि टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले असून एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळं राज्य मागं जातंय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर उद्योगमंत्री उदय सामंत राजीनाम्याच्या मागणीवरुन म्हणाले, २०१९ च्या वरळी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा काढत आदित्य ठाकरेंना डिवचलं.

राजीनामा कुणी मागावा, मी तीन पक्ष फिरुन आल्याचा उल्लेख करण्यात आला. तीन पक्ष फिरुन आलो तरी पहिल्या टर्मला माझ्या जीवावर निवडून आलो. दुसरा कुठल्या पक्षातील आमदार आपल्या मतदारसंघात घेतला नाही. उदय सामंतांनी विधानसभेच्या निवडणुका १२ हजार, ४१ हजार आणि ८९ हजार मतांच्या फरकानं जिंकल्याचं सांगितलं. या निवडणुकीला राष्ट्रवादीचा आमदार सोबत घेऊन, स्पष्ट सांगायचं तर सचिनभाऊ अहिर जे वरळीचे आमदार सोबत घेऊन निवडणूक लढलो नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलो. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आम्हाला पाण्यात बघितलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला गद्दार म्हटलं नाही. शिवसेनेचा रत्नागिरीचा पहिला आमदार म्हणून मी तुम्हाला चाललो, असं उदय सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये