“फाॅक्सकाॅन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत”
मुंबई | Uday Samant Talk About Vedanta-Foxconn Project – वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्राकडे येणारी 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदांत समूहानं जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. याच दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झालाच नव्हता. याबाबतची फक्त चर्चा झाली होती असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसंच संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. गेली दोन वर्षे कंपनीच्या कामाला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो मिळाला नाही त्यामुळे हा प्रकल्प गुजरतला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.