ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

निवडणूक आयोगाच्या नोटिशीवरून शिवसेनेचे वकील संतापले; म्हणाले, “2023 पर्यंत उद्धव ठाकरे हेच…”

नवी दिल्ली | Maharashtra Politics Supreme Court – आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या युक्तीवादावर प्रतियुक्तीवाद केला आहे.

दहाव्या अनुसूचीसंबंधी निवडणूक आयोगाने आपला काही संबंध नसल्याचं निवडणूक आयोगाचं मत चुकीचं असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला पाठवलेल्या नोटिशीचं वाचन केलं आणि ती कशी चुकीची आहे याबद्दल मत मांडलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच 2023 पर्यंत शिवसेनेचे (Shivsena) अध्यक्ष आहेत, असा युक्तीवाद देखील त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगानं दहाव्या अनूसूचीचा आणि पक्षाच्या फुटीचा काही संबंध नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. आमदार जरी अपात्र ठरले तरी राजकीय पक्षाचे सदस्य असतात हे आयोगाचं मत चुकीचं असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे. तसंच दहाव्या अनुसूचीचा यामध्ये काही संबंधा नाही हे मत कसं चुकीचं आहे हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणलं आहे.

कपिल सिब्बल ही नोटीस चुकीची असल्याचं सांगत म्हणाले, निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिशीची सुरूवातच अशी होती की शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत हे निवडणूक आयोगानं कसं ठरवलं? जर शिंदे गटाकडून सांगितलं जातंय की ते शिवसेनेत आहेत, ठाकरे गटाकडूनही असंच सांगितलं जातंय, तर मग निवडणूक आयोगानं कसं ठरवलं की शिवसेनेत दोन गट पडलेत?

उद्धव ठाकरे हेच 2023 पर्यंत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, तशा प्रकारची कागदपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहेत. त्यानुसार आता शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच असतील, निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर हेच आहे असा युक्तीवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये