ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

…तर भुजबळ आधीच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंच्या मोठं विधान!

मुबंई : (Uddhav Thackeray On Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व नेते एका मंचावर आले होते. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ ठोशास ठोसा द्यायचं चांगल जाणतात. ज्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असते तर, ते सगळ्यांना माघारी घेऊन आले असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.

दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चार महिने अधिक मिळाले असते, भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते. मात्र त्यांनी शिवसेना सोडली नसती तर आधीच मुख्यमंत्री झाले असते. यावेळी त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीची चुनूक दाखवली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीसह, काँग्रेसचे कौतुक करण्यात आले आहे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व नेते एका मंचावर आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये