“मर्दाची अवलाद असाल तर…”, उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान
अमरावती | Uddhav Thackeray – आज (10 जुलै) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमरावतीमध्ये मेळावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. माझ्यावर नेहमी एक टीका होत असते की मी घरी बसून होतो. हो मी घरी बसून होतो पण मी कुणीचीही घरं फोडली नाहीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी एवढे दिवस घरी बसून होतो अशी टीका माझ्यावर केली जात आहे. हो मी घरी बसून होतो पण मी कुणाचीही घरं फोडली नाहीत. तुम्ही तर घरफोडे आहात. मला तुम्ही कितीही काहीही म्हणा पण मी घरी बसून जे काम केलंय ते तुम्हाला घरं फोडून देखील करता येत नाही”, असा टोला ठाकरेंनी लगावला.
“ईडी, सीबीआयचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. विरोधकांना पोलिसांतर्फे नोटीसा दिल्या जात आहेत. जर तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर यंत्रणा बाजूला ठेवा. अमरावती आज शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला जेव्हा कोणी ओळखत नव्हतं तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळे खांद्यावर बसवून तुम्हाला मोठं केलं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.