शिंदेंच्या धक्क्यातून शिवसेना सावरली? चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा!

मुंबई : (Uddhav Thackeray On eknath shinde) एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे आख्खी शिवसेना खिळखिळ झाली आहे. तेव्हापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण नेते आणि शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यामुळे थोड्या प्रमाणात उर्जा मिळाली. आता आयोगाने नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यापासून सर्वांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह पहायला मिळत आहे.
दरम्यान, आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या भविष्यातील वाटचालीची चुनूक दाखवली आहे. छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. चार महिने अधिक मिळाले असते, भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते. मात्र त्यांनी शिवसेना सोडली नसती तर आधीच मुख्यमंत्री झाले असते.
यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत, शिवसेनेला शिंदेंच्या बंडखोरीच्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी फुंकार मारली. ठाकरे म्हणाले, पहिला आणि मोठा धक्का होता तो म्हणजे भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर, कुटुंबाला धक्का बसला. राग राजकारणाचा भाग झाला. मात्र आपला माणूस गेल्याने धक्का बसला होता. आता पक्षाला बसलेला धक्का हा त्याबरोबरीने काहीच नाही. यातून आम्ही बाहेर पडून पुन्हा विजय खेचून आणू. असं यावेळी ते म्हणाले.