ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

ठाकरेंचा एक वार अन् शिंदेंचे पाच आमदार गार! गुलाबरावांचा गुलाबानं काटा? पाचोऱ्यात तोफ धडाडणार..

जळगाव : (Uddhav Thackeray On Gulabrao Patil) जळगाव जिल्हातील (Jalgaon) कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवार दि. 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची पाचोरा येथे जाहिर सभा होणार आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यानंतर जळगाव जिल्हात ठाकरेंना सर्वात जास्त बंडखोरीचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंडखोरांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी सभेची जंगी तयारी करण्यात येत आहे आहे. या सभेचा टीझर देखील शिवसेनेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढताना दिवत आहे. जिल्ह्यातील पाच आमदार पक्षाला सोडून गेल्यानं खिळखळ्या झालेल्या शिवसेनाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. निष्ठावंत शिवसैनिक आणि जुन्या फळीतील काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या बळावर येथे शिवसेना वाढवण्याचे ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. तर शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांवर उद्धव ठाकरे काय तोफ डागणार हे देखील पाहाणं तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे.

माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या आणि शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी (Vaishali Suryvanshi) यांच्याकडून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील, लता सोनावणे, चिमणराव पाटील, चंद्रकात पाटील यांसारख्या नेते मंडळींना पक्षाने मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा दिली, तरी देखील या आमदारांनी पक्षाची वाताहात करून टाकली आहे.

विशेष उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून महत्वाचा शिवसैनिक असलेल्या गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेसोबत जात जोरदार धक्का दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या गुलाबराव वाघ यांना गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उभे करून गुलाबानेच गुलाबाचा काटा काढण्याच्या तयारीत तर नाहीत ना? हे पाहावं लागणार आहे.

पाचोऱ्याचे आमदार आणि वैशाली सुर्यवंशी यांचे चुलत बंधू किशोर अप्पा पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या भावाला राजकीय दृष्ट्या आव्हान निर्माण केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या सभेला राजकीयदृष्ट्या एक वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे यांची सभा पाचोरा येथील अटल मैदानावर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये