“नाग समजून पूजा केली पण तो डसला”; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदे गटावर हल्लाबोला

हिगोली : (Uddhav Thackeray On Santosh Bangar) शिवसेना ठाकरे गटाते नेते उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीताल रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पाऊस पडूदे अशी प्रार्थना केली. त्यांनी शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.
मी गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. काही जणांना वाटत असे मी त्यांच्यावर बोलेल. पण मी बोलणार नाही. गद्दाराला नांग समजून पूजा केली पण त्यांनी आपल्यावर फणा काढला. या गद्दारांना जनता जागा दाखवेल. लोकांनवी उद्धटपणा केल्यास त्यांना जागा दाखवा. नाग समजून पूजा केली पण तो डसला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केली.
सरकार थापा मारते भारी थापा मारी लय भारी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर केली. परभणीत आज शिंदे सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. शेतकरी हवालदिल आहे. पण सरकार फिरण्यात व्यस्त आहे. गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांचे भलं केलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेनेच्या मागे उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकुळ्यांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आगे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराची नाग समजून आपण पूजा केली पण तो उलटा फिरून डसायला लागला. त्यामुळे पायाखाली आला काय करायचे हे तुम्हाला माहिती आहे. याच्यासाठी पुंगी वाजवली, तुला दुध दिलं, पण हे सर्व वाया गेले. मटक्याचे धंदे करणारा हिंदुत्व कसा असू शकतो का?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांचे नाव न घेता केली.