ताज्या बातम्यारणधुमाळी

“हिंमत असेल तर तुम्ही…”, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

मुंबई | Uddhav Thackeray On Shinde Group – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागतं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आहे. तसंच मर्दांच्या हाती मशाल आहे असंही यावेळी ते म्हणाले. छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते.

“छगन भुजबळ आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्यानंतरही आज जिद्दीने उभे आहेत. बेळगावमधील फोटो कोणी पहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल”, अशी मिश्किल टिपण्णी उद्धव ठाकरेंनी केली.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागतं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे.”

“मला आल्यानंतर फारुख साहेब भेटले. वयाचं आणि महाराष्ट्र ते काश्मीर अंतर जास्त असल्यानं आमची फार काही गाठभेट होत नाही. पण बाळासाहेब आणि त्यांची चांगली मैत्री होती. आल्यानंतर त्यांनी मला अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ सांगितलं. मी काही लढाई सोडणार नाही. अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. पण त्यावेळी वादळं निर्माण करणारेही सोबत लागतात आणि ते आहेत”, असंही ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये