ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळीसिटी अपडेट्स

“खुर्ची गेली तरी चालेल पण…”, महापुरूषांच्या अवमानावरून महामोर्चात उद्धव ठाकरे गरजले

मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) होत असलेली वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीकडून आज (17 डिसेंबर) महामोर्चा (Mahavikas Aghadi Mahamorcha) काढण्यात आला. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महापुरूषांच्या अवमावरून शिंदे सरकारवर (Shinde Government) निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढा मोठा मोर्चा बऱ्याच वर्षांनंतर देशानं पाहिला असेल. या मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काहींनी विचारलं तुम्ही एवढे चालणार का? मी म्हटलं मी एकटा नाही, लाखो महाराष्ट्रप्रेमी माझ्यासोबत नुसतंच चालणार नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं आहे त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे.

अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. आम्ही तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसत आहेत, हीच महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीयेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आजच्या या मोर्चात महाराष्ट्रद्रोही सामील झालेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातोय असं म्हणणारे तोतया या मोर्चामध्ये नाहीत. राज्यपाल पद मोठं आहे, आम्ही त्याचा मान ठेवतो. पण, राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. महापुरूषांच्या विरोधात राज्यपाल वक्तव्य करतात. त्यावर राज्याचे मंत्री महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसत्या तर आज या मंत्र्यांसारखे वैचारिक दारिद्र आले असते, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

स्वत:ला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) हल्लाबोल केला.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये